विद्यार्थ्यांना पेन वाटप

0

देहूरोड । दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावीच्या परिक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना येथील सामाजिक संस्थेच्यावतीने पेन आणि गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिक्षक, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दहावीच्या परिक्षेला सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांना दरवर्षी येथील सामाजिक संस्थेच्यावतीने पेन वाटप करण्यात येते. यावर्षीही परिक्षेच्या पहिल्याच दिवशी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे, सिंधूताई तंतरपाळे, कैलाश पानसरे, अ‍ॅड. कृष्णा दाभोळे, मनीष ओव्हाळ, शशीकांत सपागुरू, वैशाली अवघडे आदींनी विद्यार्थ्यांना पेन आणि गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. उमेश ओव्हाळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.