आंबेगाव: विद्यार्थ्यांना लोकशाहीमध्ये मतदान कशाप्रकारे होते, प्रतिनिधी कशा पद्धतीने निवडणूक लढवितात याचा प्रत्यक्ष अनुभव यावा, यासाठी भारती विद्यापीठाच्या विजयमाला कदम कन्या प्रशालेत लोकशाही मतदान पद्धतीने वर्गातील पाच मंत्री निवडून आणण्यासाठी इ. 5 वी ते इ. 10 वीपर्यंत लोकशाही मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. यावेळी प्रत्येक विद्यार्थिनीने आपले मत गुप्त पद्धतीने मतपेटीत टाकले. मुख्याध्यापिका शारदा पाटील म्हणाल्या, वय 18 पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क मिळतो. या उपक्रमामुळे ही प्रक्रिया कळण्यास मदत होईल. यावेळी शिक्षक बी.डी. घार्गे, एस.बी. शिंदे, एन.डी. म्हेत्रे, एस.बी. माने. वर्गशिक्षिका एस.एस. विश्वासराव, एस.ए. माटे, एल.एम. गुरव, एन.एम. पवार उपस्थित होते.