संमेलनाच्या तिसर्या सत्रातील उपक्रम
निगडी : येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या तिस-या सत्रात विद्यार्थ्यांनी संगीतातील विविध प्रकारांचे प्रत्यक्ष अनुभव घेतले. विद्यार्थ्यांना उर्मिला भालेराव यांनी तालवाद्य, शर्मिला शिंदे आणि मिलिंद संत यांनी प्रबोधन गीते, राजीव तांबे यांनी संवादिनी, विवेक भालेराव यांनी तबला, मंजुश्री दिवाण वेल्हाणकर यांनी सुगम संगीत, नचिकेत देव यांनी नाट्यसंगीत, अजय पराड यांनी कवितांना चाली लावायला शिकविल्या. अश्विनी इनामदार यांनी कीर्तन, वर्षा अनंतरामन यांनी नृत्य (भरतनाट्यम), वैशाली पळसुले यांनी नृत्य (कथक), समीर दुबळे यांनी शास्त्रीय गायन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या हस्तलिखितांचे प्रदर्शन
संमेलन हा फक्त एक उत्सव न होता त्यावर विद्यार्थ्यांचा विशेष अभ्यास व्हायला हवा या उद्देशाने या कार्यक्रमापूर्वी सुमारे महिनाभर मुलांनी परिसरातील संगीत क्षेत्रातील प्रख्यात मान्यवरांच्या भेटी घेतल्या. या भेटीवर आधारित सुंदर व माहितीपर हस्तलिखिते मुलांनी तयार केली. या हस्तलिखितांचे प्रदर्शनही संमेलनात मांडण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते याचे उद्घाटन करुन सर्वांना बघण्यासाठी खुले करण्यात आले.
विषयाची जाण असणे आवश्यक
चौथ्या सत्राची सुरुवात स्नेहल कोकिळ यांनी सुरेल सरस्वती वंदना म्हणून केली. त्यांना उमेश पुरोहित यांनी संवादिनीवर साथसंगत केली. या सत्रात संमेलनाचे उपाध्यक्ष प्रा. समीर दुबळे संगीत परंपरेचा आस्वाद घेणे म्हणजे काय, यावर नेमक्या शब्दात मार्गदर्शन करताना म्हणाले की, कोणत्याही विषयाचा आस्वाद घेण्यापूर्वी त्याविषयी जाणीव असायला हवी. संगीत म्हणजे भाषेची पद्य स्वरुपातील रचना. आदिम संगीत यात स्वर जोरकस असतात तर ताल, लय याचा विशेष अंदाज बांधता येत नाही. पठण, श्लोक हे सामगायन स्वरुपातील संगीत आहे. आदिम संगीत, पठण संगीत, लोकसंगीत, आदिवासी संगीत, धार्मिक संगीत अशा विविध प्रकारच्या संगीतातील कोटिंच्या ध्वनिफिती ऐकवून त्याविषयी सविस्तर माहिती देऊन मुलांना संगीत आस्वादाचे नवीन दालन उलगडून दाखवले. सत्राचे सूत्रसंचालन अनघा देशपांडे यांनी केले. परीक्षार्थींचा हिरमोड होऊ शकतो. त्यासाठी दहावी व बारावीच्या परीक्षाकाळात पुणे परिमंडलामध्ये अखंडित वीज पुरवठा कसा होईल याबाबतचे नियोजन मुख्य अभियंता मल्लेश शिंदे म्हणून करावे, अशी मागणी पुणे जिल्हा विदुयत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी निवेदनाद्वारे केली.