प्रेरणा सोशल फाऊंडेशनतर्फे सत्कार समारंभ
चिंचवडः शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शेवटपर्यंत आपापल्या क्षेत्रात कायम विद्यार्थी राहायला शिकलं की आपोआप करिअर होतं. यासाठी आजीवन विद्यार्थी राहिले पाहिजे, असे मत पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी व्यक्त केले. प्रेरणा परिवार सोशल फाऊंडेशन व प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक यांच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम गुजर होते. याप्रसंगी प्रेरणा बँकेचे संचालक कांतीलाल गुजर, उप संचालक गबाजी वाकडकर, श्रीधर वाल्हेकर, सुरेश पारखी, अंकुश पर्हाड, संजय पठारे, संतोष मुंगसे, संदीप पवार, उमेश आगम, राजेंद्र शिरसाठ, नंदकिशोर तोष्णीवाल, मिना शेळके, सुजाता पारखी, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, गोरक्षनाथ झोळ, शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी विलास दसाडे, संचालक यशवंत पवार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे आदी उपस्थित होते.
अनेक टप्प्यांवर असते परिक्षा
फाऊंडेशनचे अध्यक्ष गुजर म्हणाले की, दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्याची अंतिम परीक्षा नव्हे, तो शालेय जीवनातील एक टप्पा आहे. अशा अनेक टप्प्यावर आपल्याला परीक्षेला सामोरे जावे लागते. याप्रसंगी दहावीच्या परीक्षेत स्वप्निल जावळे (99.60), पार्थ जाधव (96.20), स्वराली खुडे (96.20), सुश्रुता सोमवंशी (96.20), चैतन्य गावडे (96.20), दिया पाटील (95.40), शुभम शिंदे (94.80) व बारावीच्या परीक्षेत कानाराम कुमावत (92), पूनम पवार (90.90), गणेश शिंदे (88.46), शंतनु जाधव (86.92), वैभव शिवले (84.31) यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी तिनशे वीस विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व फाईलफोल्डर देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम दळवी यांनी केले. अंकुश पर्हाड यांनी आभार मानले.