पुणे । पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी पुण्यात विद्यार्थ्यांनी अभिव्यक्ती मूक मोर्चा काढला. यामध्ये विविध महाविद्यालयासह विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ज्येष्ठ पत्रकार आणि सामजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची बेंगळुरूत हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. चार हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला दोन आठवडे होऊन देखील अद्याप मारेकर्यांचा शोध लागू शकला नाही.
या हत्येच्या विरोधात पुण्यात विविध महाविद्यालयांसह विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढला. गुडलक चौकापासून सुरू झालेल्या या मोर्चाची सांगता महर्षी विठ्ठल रामजी पुलावर निषेधाची सभा घेऊन करण्यात आली. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राकेश कामठे आदींनी सभेत सहभाग नोंदवला.
अंनिसतर्फे चौकशीची मागणी
लंकेश यांच्या हत्येला आठवडा उलटून देखील अद्याप मारेकरी पकडण्यात सरकारला यश आले नाही. डॉ दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि प्रा कलबुर्गी यांचे यांचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे गौरी लंकेश यांचे मारेकरी तरी तातडीने पकडावेत आणि या सर्व खुनात काही साम्य आहे का, याची कसून चौकशी करावी अशी मागणी अंनिसतर्फे करण्यात आली आहे. स्वतंत्र विचार मांडणार्या आणि विवेकवादी लोंकाच्या अशाप्रकारे होणार्या हत्या हे एक प्रकारचे दहशदवादी कृत्य असल्याचे अंनिसकडून पत्रकार.