नवापूर। शिक्षण हे चार भिंतींच्या आड न राहता खेळाला आपल्या जीवनात महत्व दिले पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक खडतर मार्गावर शिक्षण हे मार्गदर्शक दीपस्तंभाप्रमाणे असावे. यासाठी मुलांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वच्छंदी मनाने शिक्षण घ्यावे असे असे प्रतिपादन विपिनभाई चोखवाला यांनी केले. ते श्रीमती प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे इ.नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचा शिक्षक पालक मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विपिनभाई चोखवाला हे मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी संचालक हेमंतभाई शाह, बबनराव जगदाळे, विनायक गावीत, राहुदेव भामरे, प्राचार्य मिलिंद वाघ, पर्यवेक्षक एम.जे. सोनवणे, व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षकांनी केले मार्गदर्शन
यावेळी पर्यवेक्षक एम.जे. सोनवणे यांनी बदलता अभ्यासक्रम त्याचे महत्व व मूल्यमापणाविषयी सखोल माहिती दिली. नारायण मराठे यांनी प्रात्येक्षिक मार्कांविषयी सांगतांना शेतीच्या चार महिन्यांच्या पिकांप्रमाणे आयुष्यभराच्या पीक म्हणजे आपली मुले त्यावरही लक्ष देण्याची गरज आहे हे सांगितले. दर्शन अग्रवाल यांनी गणित व विज्ञान हे शालेय शिक्षणाचा आत्मा आहे या विषयी विशेष जागृत असणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले. प्रसंगी जे.ए.पाठक यांनी पालकांशी सुसंवाद घडवून आणला.
यांनी पाहिले कामकाज
पालकांमधून विनायक गावीत म्हणाले की, मुलांच्या उज्वल भविष्यासाठी कॉपीमुक्त वातावरण निर्माण करून त्यांना स्वयं अभ्यासास प्रेरणा देणे हे पालक म्हणून आपले कर्तव्य आहे. राहुलदेव भामरे यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. पूनम बिर्हाडे , वंदना चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद वाघ यांनी केले. सूत्रसंचालन भरत सैंदाने यांनी तर आभार डॉ. योगिता पाटिल यांनी मानले.
मोबाईल वापर चिंता
बबनराव जगदाळे यांनी मुलांच्या वाहन, मोबाईल यांच्या वाढत्या वापरावर चिंता व्यक्त करत पालकांनी व विद्यार्थ्यांनी या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे सांगितले. पर्यवेक्षक एम.जे. सोनवणे यांनी बदलता अभ्यासक्रम त्याचे महत्व व मूल्यमापणाविषयी सखोल माहिती दिली. नारायण मराठे यांनी दर्शन अग्रवाल यांनी जे.ए.पाठक यांनी पालकांशी सुसंवाद घडवून आणला.