शहादा– सानेगुरुजी मित्र मंडळ व जायन्ट्स सहेली ग्रुप तर्फे सुयेश क्लासेस शहादा येथे नविन वर्षा निमित्त व्यासना बाबत शिबिर वघेण्यात आले .
कार्यक्रमाच्या सर्वप्रथम साने गुरुजी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माणक होते तर प्रमुख पाहुणे लोणखेड़ा जेष्ठनागरिक संघाचे सचिव देविदास पाटील,जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष भूषण बाविस्कर ,जायन्ट्स सचिव प्रमोद सोनार ,सहेली अध्यक्षा दिपाली बाविस्कर सहेली सचिव आशा चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात माणक चौधरी, भूषण बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यकमात गुणवंत विद्यार्थी फाल्गुनी राजेश अहिरे,मितालि नरेंद्र प्रजापती, यश सुरेश पाटील,अक्षय राकेश बिरारे यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी व्यसन न करण्याची व फेक न्युज फॉरवर्ड न करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास पाटील तर सूत्रसंचालन पंकज पाटिल तर आभार प्रमोद सोनार यांनी मांनले.
कार्यक्रमासाठी सानेगुरुजी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी व संदीप पवार यांनी परिश्रम घेतले.