न्यू सिटी प्राईड स्कूलचे स्नेहसंमेलन
पिंपरी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह नृत्याने, गाण्यांनी या कार्यक्रमात रंगत भरले.
नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, माजी नगरसेवक साहेबराव खरात, भगवान गोडांबे, राहुल भातकुले, बी. एस. कांबळे, रामभाऊ कुंजीर, यशोदा डेव्हलपर्सचे संचालक संजय भिसे, तात्या शिनगारे, आर. डी. भालेराव, राजीव भालेराव, मुख्याध्यापिका श्रीविद्या रमेश आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक नृत्य सादर
सांस्कृतिक कार्यक्रमा प्रारंभी चिमुकल्यांनी गणेशवंदना सादर केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी महाराष्ट्राची लोकधारा, सांस्कृतिक नृत्य, कोळी नृत्य, जंगलातील प्राण्यांवर आधारीत नृत्य, देशभक्तीपर नृत्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सादरीकरण केले. श्राबनी पत्रानाबिशब, हेमा शेलार यांनी सूत्रसंचालन केले. नीलन पौड हिने आभार मानले.