विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशिलता वाढविण्यासाठी विज्ञान स्पर्धा आवष्यक : शीला ओक

0

पुणे : शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता, स्पर्धात्मक व वैज्ञानिक वृत्तींचा विकास होवुन विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्टार्ट अप इंडिया या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी इन्स्पायर ऍवॉर्ड ही योजना शालेय विद्यार्थ्य्यांसाठी कार्यान्वित करण्यात आली असल्याचे मुख्याध्यापिका शीला ओक म्हणाल्या, जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतिने इन्स्पायर ऍवॉर्ड योजने अंतर्गत सूर्यदत्त नॅशनल स्कुल बावधन येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन एनसीआरए जीएमटीआर चे हेड ऍडमिनिस्ट्रेशन डॉ.जे.के.सोळंकी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. संजय चोरडीया,सुषमा चोरडीया, उपशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे,सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला ओक,तसेच विविध शाळांमधिल शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूर्यदत्तच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडीया म्हणाल्या हा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी मिळाल्याने आम्हाला खुप आनंद झाला आहे. अशा प्रगती दर्शक आणि सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक दर्जा वाढविणार्‍या प्रदर्शनात सतत भाग घेण्यास आवडेल. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल सर्व शिक्षक व सहकार्याचे अभिनंदन संजय चोरडीया यांनी केले.

विद्यार्थी संशोधनासाठी जपानला
इन्स्पायर ऍवॉर्ड या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातून 466 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यातील 10 टक्वे विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना पेटंट नोंदणी व आधिक संशोधनासाठी जपान येथे पाठविण्यात येणार असून विद्यार्थांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांसाठी विविध संधी उपलब्द करून देण्यात येणार आहेत.

विविध वस्तू व उपकरणांचे प्रदर्शन
प्रदर्शनात बहुपयोगी चुली,जमीन स्वच्छ करणारे वाहन,वाय फाय च्या सहाय्याने हवा आणि आवाज दर्शविणारी उपकरणे,बहुपयोगी सौरयंत्रे,सौरशक्तिवर चालणारा पाण्याचा पंप अशा प्रकारच्या नविन संशोधन केलेल्या वस्तू प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यानी मांडल्या होत्या.विविध प्रकल्पातून परवडण्यासारखे,समाजोपयोगी,पर्यावरणपूरक व नवनविन कल्पनांनी साकारलेले व सहज वापरता येणार्‍या नविन तंत्रज्ञानावर आधारीत वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या.

पालकांनी केले कौतूक
विज्ञान प्रदर्शनास आंबेगाव,भोर,बारामती,दौंड,शिरुर,वेल्हा,पुणे ,जुन्नर,इंदापुर,मुळशी,मावळ, खेड आणि पुरंदर येथिल जवळजवळ 500 शाळांनी भाग घेतला होता. यावेळी 3 हजारपेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी प्रदर्शनाला भेट देवून विद्यार्थ्य्यार्ंचे भरभरुन कौतुक केले. भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली ,महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मुंबई ,प्रादेशिक विद्या प्राधिकरण शिक्षण संस्था,नागपुर हे प्रदर्शनाचे सह प्रायोजक होते.