चिंबळी : जागतिक महिला दिनानिमित्त विद्या गवारे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदान बद्दल व पोलिस उपनिरीक्षक सविता भागवत यांना सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल श्री समर्थ प्रतिष्ठानच्या वतिने यशश्री पूरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री समर्थ प्रतिष्ठान जामखेड कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे रसिकलाल एम. धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांचा संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विद्याताई गवारे यांना कॅम्प प्रो. डॉ. भरत कासार सर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजसेवक व श्रीरूप ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक मनोजकुमार बोरसे, श्री समर्थ प्रतिष्ठानचे सेक्रेटरी जीवन साळवे, पोलिस उपनिरिक्षक सविता भागवत,समर्थ स्कूल ज्युनिअर कॉलेज व समर्थ पतसंस्थेचे संचालक शिवाजीराव गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.