विद्युत वाहनांचा चालना देण्यासाठीचे एक पाऊल
पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनाच्यानिमित्ताने टाटा मोटर्सने राज्य सरकारच्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांमध्ये 1000 विद्युत वाहने समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाबरोबर एक सामंजस्य करार केला आहे. टाटा समुहातील टाटा पॉवर लि. व टाटा मोटर्स या कंपन्याच्या सहकार्यातून महाराष्ट्रामध्ये विद्युत वाहनांना चालना देण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे. या करारामुळे महाराष्ट्र सरकारने अवलंबविलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणाला देखील प्रोत्साहन मिळणार आहे. टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गुंटर बुटशेक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार केला. याशिवाय मुख्यमंत्र्याच्या हस्ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून 5 टिगॉर ईव्ही वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. टाटा मोटर्सने ही वाहने ईईएसएल (एनर्जी इफिशिअन्सी सर्व्हिसेस लि.) या निविदा प्रक्रियेचा भाग म्हणून सरकारला दिली आहेत.
पर्यावरणपुरक विद्युत वाहने देण्यासाठी सज्ज
या प्रसंगी टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गुंटर बुटशेक म्हणाले की, टाटा मोटर्स भारत सरकारच्या ई-मोबिलिटीच्या दृष्टीकोनासाठी प्रतिबद्ध आहेत. आम्ही या प्रयत्नांसाठी महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. आमच्या कंपन्यांच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणपुरक विद्युत वाहने देण्यासाठी सज्ज आहोत. आमची प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांद्वारे अपेक्षा व भविष्यातील आवश्यकतांची पूर्तता करण्यास तयार आहेत. ईईएसएलच्या टेंडचा भाग म्हणून आम्ही अगोदरच 250 कारचे उत्पादन पूर्ण केले आहे. दुस-या टप्प्यातील ऑर्डर्सची अंमलबजावणी सुरु केली आहे. महाराष्ट्रातर्फे ईईएसएलद्वारा आज 5 टीगॉर ईव्ही वाहनांचे वितरण करून एकप्रकारे ई-मोबिलिटीला प्रोत्साहन देण्याची सुरुवात आम्ही केली आहे. भारतीय ग्राहकांसाठी विद्युत वाहनांना जलद चालना देण्यासाठी आणि भारतासाठी एक उज्वल भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी काम करत आहोत.
गाड्या प्रदूषण कमी करण्यासाठी
टाटा मोटर्सच्या भागीदारीत मुंबईत ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्याबाबत टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले की, महाराष्ट्र ईव्ही सज्ज आणि हरित तंत्रज्ञान उपायांसह सरकारच्या महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. त्यामुळे भारतामधील प्रदूषण कमी करण्यासाठी व दूषित पर्यावरण मुक्त ग्राहकांच्या भविष्य घडविण्यामध्ये टाटा मोटर्स सरकारसोबत आहे. आम्ही राज्याच्या विस्तारानुसार अनेक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसह महाराष्ट्रातील ग्राहकांना सहजसपणे कार्यक्षम व टिकाऊ तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊ.पिंपळे गुरव येथे कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाच्या पाचव्या दिवशी प्रतिष्ठानचे विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप यांच्या एकसष्ठी निमित्त संतपुजन करण्यात आले. यावेळी राजेंद्र जगताप मित्र परिवाराच्यावतीने जगताप यांना समाजभूषण पुरस्कार गौरविण्यात आले. हा पुरस्कार शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे, वारकरी शिक्षण संस्थेचे गुरूवर्य मारूती कुर्हेकर, डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांच्या प्रदान करण्यात आला. तसेच एकसष्ठ लोकांना संत तुकाराम गाथा, शाल, श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी माजी महापौर शकुंतला धराडे, मावळचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगरसेविका माई काटे, स्वामी शिवानंदमहाराज उपस्थित होते.
अधिक महिन्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या सप्ताहात दररोज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी दोन वेळ महिला मंडळाचे भजन, संध्याकाळी कीर्तन आणि रात्री जागर अस नित्यक्रम सुरू आहे. सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील असंख्य भाविक दररोज कीर्तनाचा आस्वाद घेत असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे यांनीही येथे भेट देऊन कीर्तनाचा आस्वाद घेतला.
खासदार बारणे यांचा विशेष सत्कार
वयाच्या 95 वर्षीही शरीराने थकलेले शिवशाहिर बाबासाहेबांनी यावेळी ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा… ’ हा अभंगाच्या ओळी म्हणून या विजय जगतापांना शुभेच्छा दिल्या. गुरूवर्य कुर्हेकर व डॉ. लहवितकर यांनी जगताप यांच्या कुटुंबियांचे धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करून संतमहात्म्य सांगितले. दरम्यान याच वेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनाही प्रतिष्ठानच्यावतीने माजी नगरसेवक जगताप, शाम जगताप यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संजय जगताप, निलेश जगताप व शैलेश जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.