विधानपरिषदेचे माजी सभापती फरांदे यांचे निधन

0

पुणे । विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे उपचारादरम्यान पुण्यातील खासगी रूग्णालयात निधन झाले आहे. ते 78 वर्षाचे होते. घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूतून रक्तस्राव सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. सातारा जिल्ह्यातील ओझरडे येथील ना.स. फरांदे गावचे मुळे रहिवाशी असून त्यांचे उच्च शिक्षण सोलापूर येथे झाले. सुरूवातीला त्यांनी धुळे व नंतर नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्याच काळात ते राजकारणात आले. दरम्याने नगर जिल्हा भाजपाचे ते अध्यक्ष होते. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते दोनदा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. विधान परिषदेचे उपसभापती व सभापती ही दोन्ही पदे त्यांनी भूषविली आहेत.