विधानपरिषद कर्मचाऱ्याच्या पूर्ण कुटुंबाची आत्महत्या

0

मुंबई-वांद्र्यातील शासकीय वसाहतीत एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. राजेश शिंगारे असं या कुटुंबप्रमुखाचं नाव असून ते शासकीय वसाहतीत इमारत क्र. २ येथे राहत होते. शिंगारे यांनी त्याची पत्नी आणि दोन मुलं यांच्यासमवेत विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. शिंगारे यांच्या घरात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून त्यात गरिबीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश तुलसीराम भिंगारे हे विधान परिषदेमध्ये कार्यरत होते. ते वांद्रे येथील शासकीय वसाहतीमध्ये राहत होते. शनिवारी त्यांनी पत्नी अश्विन (४०), मोठा मुलगा तुषार (२३) आणि लहान मुलगा (१९) यांच्यासह विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोटमध्ये त्यांनी गरिबीमुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.