मुंबई । राज्यात विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांनी आता चांगलाच जोर धरला आहे. सर्वच राजकीय पक्षाचे अधिकृत उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसेच काही अपक्ष आणि शिक्षक संघटनांचेही अधिकृत उमेदवार या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत. याच निवडणुकीत मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार म्हणून राज्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेने ज्ञानदेव लक्ष्मण हांडे यांना संघटनेचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
शिक्षक मतदारराजा आतातरी जागा हो… रात्र वैर्याची आहे. सर्वजण येतील, सांगतील मला मदत कर. निवडून आल्यावर तुमचे काम करतो, अशी आशा दाखवतील. पण शिक्षक बंधू-भगिनींना कळकळीची विनंती आहे की, आताच वेळ आहे बदल घडवून परिवर्तन करण्याची. तेव्हा कोणत्याही आमिषाला, दबावाला बळी न पडता राजकारणविरहित शिक्षकातला शिक्षक आमदार निवडून देण्याची ही संधी पुन्हा मिळणार नाही. विचार करा, आपण सुजाण नागरिक आहात. आपल्यासाठी झगडणारा, लढणारा, कर्तव्य तत्पर, लढवय्या, अष्टपैलू, अभ्यासू, निःस्वार्थी, आपल्या सर्वांचे हित जपणारा, राज्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचे अधिकृत उमेदवार, शिक्षकांचे युवा नेते ज्ञानदेव लक्ष्मण हांडे यांनाच पसंती क्र.1 चे मत देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करावे, असे जाहीर आवाहन संघटनेचे राज्य संघटक बाळा कोळकर यांनी केले आहे.
संघटनेला साथ द्या, हांडे सरांना पसंती क्र.1 चे मत द्या
शिक्षण क्षेत्राचा असेल ध्यास ।
तोच करील शिक्षण क्षेत्राचा विकास ॥
शिक्षण क्षेत्राची असेल जाण ।
तोच होईल शिक्षकातला शिक्षक आमदार ॥
मुंबईसह राज्यातील प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांना अनुदान मंजूर करण्यासाठी प्रखरपणे लढा देणारे राज्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य, अष्टपैलू, निःस्वार्थी, शिक्षण चळवळीतील लढवय्ये, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे युवा नेते ज्ञानदेव लक्ष्मण हांडे यांनाच पसंती क्र.1चे मत देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करण्यात यावे याकरता आता संघटनेच्या सर्वच पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे.
मुंबईतील खासगी शाळेतील व महानगरपालिकेतील प्राथमिक शिक्षक अतिरिक्त झाल्यावर नामुष्कीची टांगती तलवार टाळण्यासाठी आझाद मैदानावर केलेली उग्र आंदोलने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी लढणारा, अनेक आंदोलने करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपडणारा, असा उमेदवार राज्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेने दिलेला आहे. या संघटनेने आपला अधिकृत उमेदवार म्हणून ज्ञानदेव लक्ष्मण हांडे यांना उमेदवारी दिली असून, त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी संघटनेचे सर्वच कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असल्याची माहिती संघटनेचे राज्य संघटक बाळा कोळकर यांनी दिली आहे.