विधानसभेच्या रणनीतीसाठी उद्या भाजप-सेनेची बैठक !

0

मुंबई : शिवसेना आणि भाजपामधील अंतर्गत वाद लोकसभा निवडणुकीपूर्वी चर्चेतून सुटला. मात्र पुन्हा हा वाद नव्याने सुरु होण्याचे चिन्ह आहे. कारण विधानसभा निवडणूक लागली असून मुख्यमंत्री कोणाचा होणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. भाजप शिवसेनेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण याचा वाद काही मिटलेला नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी भाजपचाच मुख्यमंत्री असेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरुन तणाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकते. तसेच विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी शिवसेना-भाजपची सोमवारी मुंबईत बैठक होत आहे.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच मोठा भाऊ असून भाजपाचच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर आमचे ठरले दुसऱ्यांनी त्यात नाक खूपसू नये, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाजनांना लगावला. दुसरीकडे दानवेंनी मात्र आमचे ठरलेले आम्ही सांगणार नाही, असे सांगत युतीचे जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेंन्स निर्माण केला आहे. असे असले तरी भाजप आणि शिवसेना विधानसभेतही एकत्र लढणार असून लोकसभा निवडणुकीपेक्षा मोठा विजय मिळवणार असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी केली असून अब की बार २२० पार, फिर एक बार शिवशाही सरकार अशी घोषणाच भाजपाने दिली. विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेने २२० जागांचं लक्ष्य ठेवल्याचं भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री राज्यात यात्रा काढणार असून सरकारनं केलेल्या विकासाच्या जोरावर मतं मागणार असल्याचं पाटील यांनी सांगितले.