विधान परिषद निवडणुकीत सेनेचे विलास पोतनीस आणि लोकभारतीचे कपिल पाटील विजयी

0

मुंबई – नवी मुंबई- मुंबई पदवीधर मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस हे विजयी झाले आहेत. तर मुंबई शिक्षक मतदार संघातून लोकभारतीचे कपिल पाटील विजयी झाले आहेत. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरू आहे. नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू करण्यात आली आहे.

कोकण पदवीधरमधील मतदारांची संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी मतमोजणी सुस्थितीत व वेगाने होण्यासाठी २८ टेबल्स मांडण्यात आले आहेत.