विधायक उपक्रमांनी गणेश विसर्जन संस्मरणीय

0

शिंदखेडा । शहरात यंदा साजरा झालेल्या गणेशोत्सवाला अनेक गुण दोषांची झालर बघायला मिळाली.यांत अनेक सामाजिक संस्था व परीसरातील जेष्ठ व्यक्तिंनी मध्यस्थी केली .पारंपारीक चालीरितींना फाटा देत गणेशोत्सव साजरा केला.या बदलाला मंडळातील तरूणांनी देखील तेवढयाच उर्स्फूतपणे साथ दिली. प्रा.जी के परमार यांनी एमएचएसएस कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व रोटरी क्लब याच्या मदतीने दोन क्विंटलपेक्षा अधिक निर्माल्य संकलीत करण्यात आले.गेले बारा दिवस गणेशोत्सवाची सर्व ठिकाणी धामधूम होती.मंडळाचे पदाधिकारी गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रयत्नात होते.शहरात साठच्यावर लहान मोठया गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली होती. तसेच घरोघरी गणराय विराजमान झाले होते.

सामाजिक प्रबोधन
या गणेशोत्सवात काही मंडळांनी सामाजीक प्रश्नांना घेवून देखावे केले होते.यांत कॉलनी परीसरातील एका गणेश मंडळाने उभ्या केलेल्या शेतकरी आत्महत्येचे विदारक देखाव्याचीच चर्चा गणेश भक्तांमध्ये ऐकायला मिळाली. तसेच शहरात विसर्जनात विवीधता आढळून आली. सरस्वती कॉलनीतील गणेश मंडळाने जागेवरच मूर्तीला अर्ध्य देवून विसर्जन केले व मूर्ती पून्हा त्याच मूर्तीकाराकडे नेवून दिली. तसेच माळी वाड्यातील एका गणेश मंडळातील सदस्यांनी गणेश उत्सव व मिरवणूक साध्या पद्धतीने काढून गणरायाला निरोप दिला. यातून शिल्लक राहिलेला पैसा हा परीसरातील एका गरीब कुटुंबासाठी वैद्यकिय कामासाठी दिला. विधायक कृतीने काही गणेश मंडळ अपवाद ठरली आहेत. तर काही मंडळांनी मिरवणूकित डिजे लावून विभत्स गाणे लावून त्यावर ताल धरला. रोटरीतर्फे प्रत्येक मंडळाला निर्माल्य संकलनासाठी एक मोठा खोका देण्यात आला.