मुंबई-आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे. यावेळी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहत त्यांच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व.अटलजी यांच्या रूपाने या देशाने विचारांचा महासागर गमविले आहे असे सांगितले. अटलजी यांनी जो पाया रुजविला आहे. त्याच्यावरच आज मोदी सरकार काम करीत आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.