विधिमंडळ अधिवेशनात अर्नब गोस्वामीवर हक्कभंगाचा प्रस्ताव; सभागृहात गदारोळ

0

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्नब गोस्वामी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच नेत्यांवर एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला आहे. हेतुपुरस्सर आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधान केले असल्याने अर्नब गोस्वामीवर विशेष अधिकार भंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्यास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणताना भाजपने चांगलाच गदारोळ केला. महाराष्ट्र सरकार आणि जनतेचा हा अवमान असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.