विनयभंगातील आरोपीला सुनावली तीन वर्षांची शिक्षा

0

जळगाव । जामनेर तालुक्यातील सामरोद येथे 11 ऑगस्ट 2015 रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. यानंतर पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिस ठाण्यात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला न्यायाधीश ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात सुरू होता. त्यात आज गुरूवारी न्यायाधीश दरेकर यांनी विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी तरूणाला 3 वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी ही 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मोयखेडा दिगर रस्त्यावरून शौचास जात होती. त्यावेळी राहुल तुकाराम सुरवाडे (वय-24 रा. सामरोद) हा तरूण मागून येवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. यानंतर अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिस ठाण्यात राहुल सुरवाडे यांच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायाधीश ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होवून याप्रकरणी सरकारपक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीत मुलगी, मामभाऊ, मामी, बीडीओ, पंच, तपासी अधिकारी या साक्षीदारांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या.

न्यायाधीश ज्योती दरेकर यांनी विनयभंग प्रकरणी मंगळवारी 16 मे रोजी निकाल दिला. त्यात न्या. दरेकर यांनी आरोपी राहुल तुकाराम सुरवाडे याला कलम 354 प्रमाणे 3 वर्ष कैदेची शिक्षासह 1 हजार रुपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साधी कैदची सुनावल. तर बालकांचे लैगिंग अत्याचार संरक्षण कायदा कलम 8 प्रमाणे 3 वर्ष शिक्षा, 1 हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास 3 महिने साधी कैद तसेच पोक्सो कलम 12 प्रमाणे 3 वर्ष शिक्षेसह 500 रुपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास 2 महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. यातच ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगायची आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.