पिंपळनेर । येथील विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक विना वेतन काम करीत असून त्यांनी वेतनसाठी 1 ऑगस्टपासून शाळा बंद व काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास इंदिरा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
शाळेतील शिक्षकांचे वेतन त्वरीत सुरू करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षकांच्या आंदोलनामुळे त्यांचे शैक्षणिक नुकासन होत असल्याचेही त्यांनी नमुद केले आहे. शिक्षकांनी केलेल्या मागण्या हक्काच्या असल्याने शासनाने त्यांच्या मागण्यांचे दखल घेवून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकासान टाळावे अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे.