जळगाव । गेल्या दहा वर्षापासून लाळग्रंथीमध्ये 20एमएमचा खडा असल्यामुळे वारंवार जबडा सुजणे, बोलतांना त्रास होणे, अत्यंत वेदना होणे, गिळतांना वेदना होणे, तोंड उघता न येणे असा प्रचंड त्रास होता. या अगोदर रत्नागिरी येथे कार्यरत असतांना हा प्रचंड त्रास झाल्यामुळे मी अनेक चाचण्या केल्यात. नाक कान घसा तज्ज्ञांकडून तपासण्या केल्यात, सिटीस्कॅन झाले मला सर्वांनी ऑपरेशन करुन मी हा खडा काढावा असा सल्ला दिला. मात्र जळगाव येथील डॉ. रितेश पाटील हे होमिओपॅथी डॉक्टरांकडून औषधोपचार केल्याने लाळग्रंथीमधून खडा निघाल्याने मला मोठा दिलासा मिळाल्याचे चाळीसगावचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी डॉ. रितेश पाटील यांच्या माध्यमातून पत्रकार परीषेदत सांगितले.
विविध प्रकारच्या औषधोपचारानंतरही उपयोग नाही
अतिरिक्त पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर पुढे बोलतांना सांगितले की, मला सर्वांनी ऑपरेशन करुन मी हा खडा काढावा असा सल्ला दिला. ऑपरेशन करण्याची माझी स्वतःची, परिवाराची मानसिकता मुळीच नव्हती म्हणून औषधोपचार सुरु केलेत. तात्पुरता त्रास कमी होत होता. मात्र खडा जसेच्या तसा राहायचा. पुणे, सातारा, रत्नागीरी येथेही उपचार केला मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही, त्यातच माझी बदली जळगाव जिल्ह्यात झाली. जळगाव येथे आल्या नंतर पुन्हा तोच त्रास, त्याच वेदना सुरु झाल्याने तपासण्या, चाचण्या केल्यानंतर 20 एम.एम खडा असलयाचे निष्पन्न झाले. माझ्या परिवाराची ऑपरेशन करण्याची तयारी नव्हती. त्याच सुमारे दोन वर्षांपूर्वी होमिओपॅथीक तज्ज्ञ डॉ. रितेश पाटील संपर्क आल्यानंतर सर्व रिपोर्ट बघून वेदना हळू हळू कमी होती आणि खडा निघेल असे खात्रीपूर्वक सांगितले. लाळग्रंथीत खड्याची साईज मोठी असल्यामुळे निघणे अवघड वाटत होते मात्र नियमित होमिओपॅथिक औषधी घेतल्याने औषधेही सुरु ठेवलेली होती आणि न कळत 20 एम.एम हा खडा जीभेखालून ओढून काढला. काही तासातच माझ्या वेदना याकमी झाल्यात. विना ऑपरेशन 20 एम.एम.खडा निघाल्याचा त्रास खूप होता. त्यानंतर चाचण्या व सिटीस्कॅन केले असता मी आता नॉर्मल असल्याचेही यावेळी नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.