जळगाव । मोहाडी-शिरसोली रस्त्यावरील नाल्याजवळून अवैधरित्या वाळु वाहतुक करतांना मंगळवारी सकाळी 11.30 वाजता तहसलिदार व शिरसोली तलाठींनी पकडले. दरम्यान, चालकाकडे परवाना व पावती नसल्याने तहसिलदार यांनी चालकासह ट्रॅक्टरला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक-मालकविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्य.. दोघे अद्याप फरारच
मंगळवारी 11.30 वाजता तहसिलदार अमोल निकम यांना मोहाडी-शिरसोली रस्त्यावरील नाल्याजवळ 1 ब्रास चोरटी वाळु वाहतुक करतांना ट्रॅक्टर (क्रं. एमएच.19.पी.4768) आढळुन आले. त्यांनी शिरसोली येथील तलाठ्यांना बोलवून घेत टॅ्रक्टरचालकाची विचारपूस केली असता त्याने अक्षय गोपाल आडबाल असे नाव सांगितले. यानंतर परवाना व पावतीबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवा-उडवीचे उत्तर दिल्याने तो विनापरवाना चोरटी वाळु वाहतुक करत असल्याचे निकम यांना स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर कारवाई करत ट्रॅक्टरसह चालक अक्षय आडबाल याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देत तक्रार दाखल केली. त्यानुसार 3 हजार रुपये किंमतीची 1 ब्रास वाळुची चोरीटी वाळतुक केल्याप्रकरणी चालक अक्षय अडबाल व ट्रॅक्टरमालक गोपाल नामदेव बारी यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.