विनीत सावंत, प्रियंका कारंडे प्रथम

0

मुंबई । प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा या थीमवर आधारित प्रभादेवी येथे कस्टम पॉइंटच्या वतीने सायकल मास्टर स्पर्धेत पुरुष खुल्या गटात विनीत सावंत तर महिला खुल्या गटात प्रियंका कारंडे यांनी पटकावले.

सध्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा या थीमवर आधारीत घेण्यात आलेल्या सायकल स्पर्धेत मुंबईच्या विविध भागांतून 4000 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यात पुरुष खुल्या गटात मच्छिंद्र पवार द्वितीय क्रमांक, प्रकाश पोळेकर तृतीय क्रमांक, अठरा वर्षाखालील गटात सागर दवडे प्रथम क्रमांक, सिद्धेश शर्मा द्वितीय तर कासिब खानने तृतीय क्रमांक पटकाविला. महिलांच्या गटात मधुरा वायकर दुसरी, स्वप्नाली सुतार तिसरी तर चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब धीरेन बोला हिला मिळाला. कैलाश गुप्ता व नितीन प्रधान यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले.