पुणे । पुणे विमानतळावर आलेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक कोटी किंमतीचे तीन किलोपेक्षा अधिक सोने जप्त करण्यात आले आहे. एअर इंडियाच्या दुबईवरून येणार्या विमानातून आलेल्या इसमाजवळून हे सोने ताब्यात घेण्यात आले आहे.
यामध्ये तीन-होडीयम प्लेटेड गोल्ड वायर, सोन्याची सात बिस्कीटे आणि सोन्याच्या 59 प्लेट्स यांचा समावेश असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दुबई-पुणे प्रवास करणार्या एका प्रवाशाच्या वैयक्तिक झडतीमध्ये हे सोने आढळले. याप्रकरणी एका व्यक्तीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने हा गुन्हा कबूल केला असून त्याला अटक करण्यात आली. मुख्य न्यादंडाधिकारी सत्यशीला कटारे यांच्या समोर झालेल्या सुनावणीनंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.