शिंदखेडा। तालुक्यातील विरदेल येथे गेल्यावर्षीं झालेल्या मुसळधार पावसाने सुमारे 118 घरांचे कमी प्रमाणात तर काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकासानग्रस्तांना मदतीचे पंचनामे करून प्रशासनातर्फे तसा प्रस्ताव माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी पाठपुरावा करून मंजूर करून दिला आहे. यात 118 घरांच्या लाभार्थ्यांना सुमारे 20 लाख 3 हजार 510 रूपयांची मदत मिळाली आहे.
आदिवासी वस्तीत आनंद
विरदेल येथील घरांचे 2015 साली पावसाळ्यात गाव तसेच आदिवासी वस्तीत नाल्याचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या रहिवाशांना शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. येथील 118 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 ते 5 हजार रूपयांचा धनादेश वाटप विरदेल ग्रामपंचायतीत माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच गिरीष बिर्हाडे, माजी पं.स. सदस्य प्रकाश चौधरी, उपसरपंच ज्ञानेश्वर माळी, माजी सरपंच सतीष गोटू बोहरे, ग्रामपंचायत सदस्य हिरालाल गावीत, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र धनगर, अरूण पाटील, शरदराव बेहरे, मधुकर बेहरे, लिलेश्वर बेहरे, ग्रामसेवक विजय जाधव आदी उपस्थित होते.