पतीला 20 पर्यंत कोठडी
नंदुरबार : मद्यपी पतीकडून सतत होणार्या मारहाणीच्या त्रासाला कंटाळून अक्कलकुवा तालुक्यातील विरपूर येथे विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याबाबत पतीवर गुन्हा दाखल झाला असून 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़.
वारंवार माहेरी का जातेस, या कारणावरुन मालती केसरसिंग पाडवी (34) या विवाहितेला पती केसरसिंग भागा पाडवी यांच्याकडून दारु पिऊन सतत मारहाण होत असल्याची फिर्याद देण्यात आली आहे़ गेल्या दोन वर्षांपासून मयत महिलेस शिवीगाळ व मारहाण करण्यात येत होती़ वारंवार पतीकडून अशा प्रकारे छळ करण्यात येत असल्याने मयत मालती पाडवी अनेकवेळा माहेरी निघून जात होती. बुधवारी 15 रोजी मालती आपल्या माहेरी आल्यावर पती केसरसिंग पाडवी याने जोरदार भांडण केले होते. सतत माहेरी का जाते, असा जाब विचारत पुन्हा माहेरी आल्यास जिवे ठार मारु, अशी धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे़ .
माहेरी भांडण झाल्यानंतर पती केसरसिंग याने मालती यांना आपल्या घरी आणले़ . परंतु घरी आल्यावर पुन्हा पतीचा त्रास सुरु झाल्याने अखेर या जाचाला कंटाळून मालतीने विरपूर येथील एका शेतात विषारी द्रव्य प्राशन केले़ यातच तिचा मृत्यू झाला़ याबाबत मालतीचा भाऊ भिमसिंग खेमा वसावे (24, रा़ डांबरापाडा ता़ अक्कलकुवा) यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस हवालदार मुकेश पवार करीत आहेत़
नंदुरबार : मद्यपी पतीकडून सतत होणार्या मारहाणीच्या त्रासाला कंटाळून अक्कलकुवा तालुक्यातील विरपूर येथे विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याबाबत पतीवर गुन्हा दाखल झाला असून 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
वारंवार माहेरी का जातेस, या कारणावरुन मालती केसरसिंग पाडवी (34) या विवाहितेला पती केसरसिंग भागा पाडवी यांच्याकडून दारु पिऊन सतत मारहाण होत असल्याची फिर्याद देण्यात आली आहे़ गेल्या दोन वर्षांपासून मयत महिलेस शिवीगाळ व मारहाण करण्यात येत होती़ वारंवार पतीकडून अशा प्रकारे छळ करण्यात येत असल्याने मयत मालती पाडवी अनेकवेळा माहेरी निघून जात होती. बुधवारी 15 रोजी मालती आपल्या माहेरी आल्यावर पती केसरसिंग पाडवी याने जोरदार भांडण केले होते. सतत माहेरी का जाते, असा जाब विचारत पुन्हा माहेरी आल्यास जिवे ठार मारु, अशी धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे़ माहेरी भांडण झाल्यानंतर पती केसरसिंग याने मालती यांना आपल्या घरी आणले़ परंतु घरी आल्यावर पुन्हा पतीचा त्रास सुरु झाल्याने अखेर या जाचाला कंटाळून मालतीने विरपूर येथील एका शेतात विषारी द्रव्य प्राशन केले़ यातच तिचा मृत्यू झाला़ याबाबत मालतीचा भाऊ भिमसिंग खेमा वसावे (24, रा़ डांबरापाडा ता़ अक्कलकुवा) यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस हवालदार मुकेश पवार करीत आहेत़