विशाखापट्टणम : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. कोहलीने 9 हजार ते १० हजार हा १ हजार धावांचा पल्ला फक्त अकरा डावांमध्ये गाठला आहे.
कोहलीने दहा हजार धावांचा टप्पा 205 धावांमध्ये ओलांडत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकले आहे. सर्वात कमी डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्याचा मान आता क्रिकेट विश्वामध्ये कोहलीने मिळवला आहे.