दिल्ली:इंग्लंड दौऱ्यानंतर विराटला विश्रांती देण्यात आली असल्याने तो आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाही. या स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात मनिष पांडे, केदार जाधव आणि अंबाती रायडू हे तडाखेबंद खेळी करणारे फलंदाज आहेत. या स्पर्धेत ३७ वर्षीय महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर संथ खेळीमुळे धोनीवर टीका झाली होती.