विराटने बीसीसीआयला सुनावले

0

नागपूर । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांने अति क्रिकेटबाबत भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) खडे बोल सुनावलेत. दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍याआधी खास बीसीसीआयला हे बोल सुनावलेत तसेच बीसीसीआयच्या नियोजनावर तोंडसुख घेतलेय. सध्या भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका सुरू आहे. कसोटीनंतर तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेचा दौर्‍यावर जाणार आहे. सततच्या या मालिकांमुळे खेळाडूंना तयारीसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तयारीसाठी किमान वेळ मिळाला पाहिजे, असे विराट कोहली यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेय.

विराट म्हणाला, कोणत्याही मालिकेच्या तयारीसाठी किमान एका महिन्याचा वेळ मिळायला हवा. मात्र, तो मिळत नाही. नाईलाजाने आम्हाला मिळेल त्या वेळात तयारी करावी लागते. या सार्‍याचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतोय, अशी खंत व्यक्त त्याने केली. दक्षिण अफ्रिकेच्या दौर्‍याआधी आमच्या हातात केवळ दोन दिवस आहेत. आमच्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही. या दोन दिवसांत आम्हाला सर्व तयारी करावी लागणार आहे. सध्या श्रीलंका मालिका सुरू आहे. आणि स्वत:ला फिटही ठेवावे लागणार आहे, असे विराटने बोलून दाखवले. क्रिकेट खेळाचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. कोणताही परदेश दौरा असला तर अन्य संघ तयारीसाठी खूप वेळ घेतात. याउलट भारतीय संघाची स्थिती आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर बोलेल जाते.