बर्मिंगहॅर्म । भारतीय संघाचे चाहते फक्त देशात नाही तर विश्वात आहे.ते चाहते आपल्या आवडत्या खेळाडूसाठी काहीही करतात. याच सर्वाधिक चाहते असलेला चॉकलेट व तरूणीच्या मनातील ताईत बनला आहे तो भारताचा स्टार फलंदाज कर्णधार विराट कोहली यांचा भाव चांगलाच वधारला आहे. नुकतेच विराट कोहलीचे चित्र एका ब्रिटनमधील व्यावसायिका पुनम गुप्ता हिने 2 लाख 90 हजार ब्रिटीश पाऊंड (भारतीय चलनात 2.4 कोटी रूपये)मध्ये विकत घेतले आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या फाऊंडेशनने नुकतेच चॅरिटी डिनरचे आयोजन करण्यात आले होते.या डिनरमध्ये संपुर्ण भारतीय संघासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये ख्यातनाम चित्रकार साशा जाफरी यानी विराट कोहलीचे चित्र रेखाटले होते. या चित्राचे वैशिष्ट होते की विराट कोहलीची गेल्या 10 वर्षातील आयपीएलमधील कारकिर्द रेखाटली होती. या कार्यक्रमात ब्रिटनमधील व्यावसायिक पुनम गुप्ता यांनी कोहलीचे पेंटिंग विकत घेतले. यासाठी त्यांनी 2 लाख 90 हजार ब्रिटीश पाऊंड मोजले.
क्रिकेटपटूंची युवा पिढी आवडते -गुप्ता
साशा जाफरी यांनी अनेक पुरस्कारांवर नाव कोरले असून जगातील सर्वोत्तम चित्रकारांमध्ये त्यांनी गणना होते. डेव्हिड बॅकहम, महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंग यांच्या चॅरिटीमध्येही त्यांचे योगदान आहे. कोहलीचे चित्र विकत घेणार्या स्कॉटलँडमधील पीजी पेपर्स या कंपनीच्या सीईओ पुनम गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘मला भारतीय क्रिकेटपटूंची युवा पिढी आवडते. ते जबाबदारीने खेळतात. विराटच्या सामाजिक कार्याने मी प्रभावित झाले आहे’ असे त्यांनी सांगितले.