विरावलीत शेतातील किरकोळ कारणांवरून दंगल : चौघे जखमी

यावल : तालुक्यातील विरावली येथे शेतातील किरकोळ कारणांवरून दोन गटात दंगल झाली यात दोन्ही गटातील 10 जणांविरूध्द दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तुंबळ मारहाणीत चार जण जखमी झाले.

दोन्ही गटातर्फे तक्रार
विरावली, ता.यावल येथे रविवारी दोन गटात शेतातील किरकोळ कारणावरून दंगल घडली. यात लिलाबाई पाटील यांच्या फिर्यादीनुसार शेतातील वाड्यात असतांना गावातील किशोर निळे याने यांच्या चार्‍याच्या कुटीवरुन ट्रॅक्टर नेले. याविषयी लिलाबाई यांनी विचारले असता त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देली. यावर लिलाबाई यांचा मुलगा अतीक पाटील व प्रमोद पाटील यांनी किशोर निळे यास जाब विचारला असता त्याने व चेतन सुनिल धनगर, हेमत किशोर धनगर, सुनिल आत्माराम धनगर, आत्माराम दोधु धनगर अशा पाच जणांनी लिलाबाईसह त्यांच्या दोघं मुलाना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली म्हणुन पाच जणांविरूध्द दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
याच कारणावरून फिर्यादी चेतन सुनील निळे यास विरावली गावातील सशंयीत पिंटु गणेश पाटील, प्रमोद गणेश पाटील, विनोद हिरामण पाटील, विक्रम हिरामण पाटील व भैय्या भागवत पाटील या पाच जणांनी मारहाण केली यामध्ये त्याच्या डोक्यास जबर दुखापत झाली असुन या पाच जणांविरूध्द दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय देवरे, किशोर परदेशी करीत आहे.