चौघांविरुद्ध गुन्हा ; अतिक्रमणावरून वाढला वाद
फैजपूर- ग्रामपंचायत सदस्याने अतिक्रमण केल्याने त्याबाबत केलेल्या तक्रारीनंतर उभयंतांमध्ये वाद उद्भवून संशयीतांना सदस्यालाच वीट मारून फेकत मारहाण केल्याची घटना विरोद्यात घडली. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य मधुकर सीताराम चौधरी (विरोदा) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी मधुकर दगडू सोनवणे, गोपीचंद मधुकर सोनवणे, रवींद्र गोपीचंद सोनवणे, जनाबाई गोपीचंद सोनवणे यांच्याविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 15 रोजी सकाळी सात वाजता ही घटना घडली. तपास एएसआय हेमंतकुमार सांगळे करीत आहेत.