विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब !

0

नवी दिल्ली-राफेल कराराची चौकशी व्हावी या मागणीसाठी आज विरोधी पक्षांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ केला. लोकसभेत विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे कामकाज होऊ शकले नाही. अखेर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

कामकाज सुरु झाल्यापासून दोन वेळा सभागृह तहकूब करण्यात आले मात्र, विरोधकांची घोषणाबाजी कायमच असल्याने अखेर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. कॉंग्रेस, तेलुगू देशम पार्टी, शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात गदारोळ केला.