निंभोरा – जवळच असलेल्या विवरा शिवारात बेपत्ता असलेल्या इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. खिर्डी येथील राजेंद्र जवाहरलाल कोरकु (28) हा युवक 20 फेबु्रवारीपासून बेपत्ता झाला होता. शनिवारी विवरे शिवारातील गट नंबर 757 मधील शेतकरी वासुदेव भंगाळे यांच्या मक्याच्या शेतात दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. राजेंद्रचा मृत्यू विषारी पदार्थ सेवनाने झाल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तवला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र जैन करीत आहेत.