विवरे येथे दारुबंदीसाठी रणरागिणींची धडक

0

विवरे । गावात सर्रासपणे सुरु असलेल्या दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने संतप्त झालेल्या रणरागिणींनी अखेर मंगळवार 19 रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. तसेच ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन देऊन गावात सुरु असलेली दारु बंद करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अन्यथा उपोषणाचा दिला इशारा
गावात तरुणांपासून ते वयस्कर व्यक्तिंपर्यंत दारुचे व्यसन जडले आहे. यामुळे महिला वर्गांना मोठा त्रास सहन करावा लागत असून लवकरात लवकर गावात दारुबंदीचा ठराव करण्यात यावा. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची तयारीही यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी दर्शवली.