रावेर- तालुक्यातील विवरा येथील रहिवासी असलेल्या वामन कडू पाटील (49) यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राहत्या घरातील मागच्या खोलीत साडीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या बाबत निंभोरा पोलिसात दिलीप कडू पाटील (47, विवरा बु.॥) यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चा तीन मुली, पत्नी असा परीवार आहे. तपास एसएसआय ज्ञानेश्वर पाकळे, हवालदार विजय चव्हाण, हवालदार राजेश वराडे करीत आहेत.