जळगावच्या छळ : पतीविरोधात गुन्हा

जळगाव : शहरातील गेंदालाल मिल भागातील माहेर असलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीविरोधात गुन्हा
जळगावातल्या गेंदालाल मिल परीसरातील माहेर असलेल्या मनिषा विष्णू बावस्कर (24) यांचा विवाह बोदवड तालुक्यातील कोल्हाडी येथील विष्णू काशिनाथ बावस्कर यांच्याशी 2014 मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या 6 महिन्यानंतर पती विष्णू बावस्कर हे काहीही कारण नसताना तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. दरम्यान नातेवाईकांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न करून पुन्हा विवाहितेला सासरी नांदण्यास पाठविले .परंतु पुन्हा तीच परिस्थिती होती होऊन शारीरिक व मानसिक छळ करून गांजपाठ केला व शिवीगाळ करून विवाहिता मनीषा बावस्कर यांना घरातून हाकलून दिले. त्यानंतर विवाहिता जळगाव येथे माहेरी निघून आल्या. त्यांनी गुरुवार, 3 मार्च रोजी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने संशयीत आरोपी पती विष्णू काशिनाथ बावस्कर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस नाईक स्वप्नाली सोनवणे करीत आहे.