भुसावळ : शहरातील रहिवासी व जळगावातील विवाहितेचे माहेरून दहा लाख रुपये न आणल्याने सासरच्यांनी छळ केला. या प्रकरणी पती, सासू, सासर्यासह आठ जणांविरूध्द बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ
भुसावळातील पापा नगरातील रहिवासी सना कौसर सलमान खान (रा. तवक्कल किराणा दुकानाजवळ, शिवाजी नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, सासरच्यांनी माहेरून प्लॉट घेण्यासाठी 10 लाख रुपये आणावेत म्हणून छळ केला तसेच शिविगाळ केली. हा प्रकार 20 मे 2020 पासून ते 15 मे 2021 या काळात घडला. या प्रकरणी पती सलमान मेहमूद खान, सासू नौशाबी महेमूद, सासरे महेमूद खान, जेठ मजहर खान, जेठाणी मलेकी बी.मजहर खान (रा.तवक्कल किराणा दुकानाजवळ, जळगाव), नणंद नसीम बी खान, नंदोई हनिफ खान, (रा. एरंडोल), गणी (पूर्ण नाव माहित नाही, रा.शिर्डी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मिलिंद कंक तपास करीत आहे.