भोसरी : विवाहितेचा पाठलाग करून अंगाला हात लावून विनयभंग करणार्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनक नागेश्वर सिंह (वय 45) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचा आरोपी जुलै 2018 पासून सतत पाठलाग करत होता. 11 जानेवारी रोजी लांडेवाडीत आरोपीने महिलेला अश्लील शब्द वापरले. तसेच तिच्या अंगाला हात लावून विनयभंग केला. सहायक पोलीस निरीक्षक ठुबल तपास करत आहेत.