विवाहितेचा मुलीच होतात म्हणून छळ

भुसावळ : शहरातील माहेर व अहमदाबाद येथील सासर असलेल्या विवाहितेचा मुलीच झाल्याने पतीसह सासरच्यांनी छळ केला. या प्रकरणी पतीसह सात जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदाबादच्या आरोपींविरोधात गुन्हा
फिर्यादी संगीता विशाल निसाळ (35, महात्मा फुले नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, 17 ते 2011 ते 20 फेब्रुवारी 2020 दरम्यान पतीसह सासरच्या मंडळींनी लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्याने घटस्फोट द्यावा म्हणून छळ केला तसेच घरातून हाकलून दिले. या प्रकरणी संशयीत आरोपी तथा पती विशाल रमेश निसाळ (35), सासु कमला रमेश निसाळ (60), नणंद अनिता नारायण सपकाळे (40), नणंद बिंदीया शरद सोनवणे (45), नंदोई शरद रामा सोनवणे (50), सोनल विनोद ठाकूर (सर्व रा.शिवनगर सोसायटी, नूतन स्कूलजवळ, भाईपूरा, हडकेश्वर सोसायटी, अहमदाबाद) यांच्याविरोधात शहर पोलिसात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय ईकबाल सैय्यद करीत आहेत.