विवाहितेचा मृतदेह इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी धुळ्याला रवाना

0

जळगाव : शहरातील हतनूर कॉलनीत राहणार्‍या 24 वर्षीय विवाहितेचा रविवारी सायंकाळच्या सुमारास संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्या विवाहितेला जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर सारसरच्या मंडळींनी तिला ठार मारल्याचा आरोपही माहेरच्या मंडळींनी केला होता. याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. यातच आज सोमवारी माहेरच्या मंडळींनी जिल्हा रूग्णालयात विवाहितेचा मृतदेह धुळे येथे घेवून जाण्यावरून गोंधळ घातला. अखेर दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास विवाहितेचा मृतदेह धुळे येथे इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

खून केल्याचा केला होता आरोप
रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास चेतन याने पत्नी युक्ता हिला जिल्हा रूग्णालयात मृतवस्थेत दाखल केले. यानंतर तो तेथून निघून गेला. युक्ता हिच्या भाऊ रितेश पोहाचला असता त्याने आपली बहिण मृत असल्याचे पाहताच त्याने हंबरडा फोडला. मुलीचा मृत्यू झाल्याचे कळताच तीच्या आईने एकच आक्रोश केला. यात त्या भोवळ येवून पडल्या होत्या. त्यानंतर माहेरच्या मंडळडींनी येवून खाली पडल्या. यानंतर मयत युक्ताचा मानेवर खरचटल्याचे तर अंगावर मारहाण केल्याचे व्रण असल्याने तिचा खून करण्यात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. यामुळे रूग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

खूनींना अटक करा…
सासरच्या मंडळींनी युक्ता हिचा गळा आवळून खुन केला असून त्यांना पोलीसांनी अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करवा अशी मागणी सोमवारी सकाळी माहेरच्या मंडळींकडून झाली. तर पैशांसाठी व मुलगी झाल्याच्या कारणावरून युक्ता हिचा खून केल्याचा आरोप मयताच्या भावाने व मामाने केला. यानंतर जो पर्यंत खुनींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी घेतल्याने गोंधळ झाला. नातेवाईकांची रूग्णालयात चांगलीच गर्दी असल्याने रामानंद पोलीसांना ताफा रूग्णालयात दाखल झाला होता .

धुळ्यात इन कॅमेरा शवविच्छेदन
सोमवारी सकाळपासूनच माहेच्या मंडळींनी युक्ता हिचा धुळे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन व्हावे असा तगादा लावत गोंधळ सुरू ठेवला होता. यातच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सदस्या शोभा चौधरी व काही सदस्या देखील रूग्णालयात दाखल झाल्या होत्या. दुपारी 1.30 वाजता रामानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रविण वाडील हे रूग्णालयात आल्यानंतर त्यांनी मयताच्या नातेवाईकांची समजूत घातली. यानंतर जिल्हा रूग्णालयातच शवविच्छेदन करण्याचे ठरले. मात्र, काही वेळानंतर पुन्हा शवविच्छेदन हे धुळ्यात इन कॅमेरा व्हावे नातेवाईकांचे ठरल्यानंतर दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास विवाहितेच्या मृतदेहास रूग्णवाहिकेतून धुळे येथे इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी रवाना केले. विवाहितेच्या नातेवाईकांन रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याची दिसून आले.

चौघांना चौकशीसाठी घेतले ताब्यात
रामानंद नगर पोलीस ठाण्यात युक्ता दंडगव्हाळ हिच्या मुत्यूबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, मुलीच्या माहेरच्या मंडळींनी केलेल्या आरोपांच्या आधारावर रामानंद नगर पोलीसांनी रविवारी रात्री विवाहितेचा पती चेतन, सासरे सुनिल तर चुलत मामा कांतीलाल सोनार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर सोमवारी दुपारी सासू प्रमिला दंडगव्हाळ (सोनार) यांना चौकशीसाठी पोलीसांनी बोलविले होते. चौघांना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे पोलीसांनी सांगितले.

शवविच्छेदनचा अहवाल आल्यानंतरच गुन्हा
युक्ताबाई सोनार यांच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपवरुन संशयित म्हणुन चेतन सोनार, सुनिल सोनार, प्रमिला सोनार, कांतिलाल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकार्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्यामुळे धुळे येथे ईनकॅमेरा शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पोनि. प्रविण वाडिले यांनी दिली.