विवाहितेचे धुम स्टाईल मंगळसूत्र लांबवणारा चोरटा जाळ्यात

0

भुसावळ शहर पोलिसांची कामगिरी ; स्केचवरून लागला आरोपीचा शोध

भुसावळ- धूम स्टाईल येत पायी फिरणार्‍या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवणार्‍या भामट्यास शहर पोलिसांनी अटक केली आहे. राज अरविंद भालेराव (21, रा.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ओळख परेडसाठी पोलिस कोठडीचा हक्क राखून आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 14 नोव्हेंबर 2018 रोजी तक्रारदार रवींद्र इंगळे हे पत्नीसह सायंकाळी पायी फिरायला निघाल्यानंतर यावल रोडवरील गजानन महाराज नगराजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी इंगळे यांच्या पत्नीच्या गळ्यातील 32 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबवले होते. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध गुरनं.100/18, 392, 34 अन्वये गुन्हा दाखल होता. आरोपींचा शोध लागण्यासाठी तक्रारदाराने दिलेल्या वर्णनावरून स्केच बनवण्यात आल्यानंतर आरोपीची ओळख पटल्यानंतर गुरूवारी रात्री पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मो.सैय्यदवली, चालक शेखर गाडगीळ, सुनील सैंदाणे, भूषण चौधरी, जुबेर शेख, ईजराईल खाटीक, संजय पाटील, विशाल साळुंखे, लाड आदींनी आरोपीच्या लोणारी मंगल कार्यालयाजवळून मुसक्या आवळल्या. तपास हवालदार मो.सैय्यद वली करीत आहेत.