मुक्ताईनगर। तालुक्यातील रुईखेडा येथील 27 वर्षीय विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरा व दिर यांच्याविरुध्द मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमजानबी विनोद मुलतानी (वंजारी) (रा. रुईखेडा) या विवाहितेस सासरा तालेखा शेख मुलतानी (वंजारी), दिर शेखलाल तालेखा मुलतानी (वंजारी) (दोघे रा. रुईखेडा) यांनी घर खाली करण्याच्या कारणावरुन रमजानबी हिस शिवीगाळ व दमदाटी करुन 26 रोजी पहाटे 2 तेे 5 वाजेच्या सुमारास सासरा व दिर यांच्या जाचास कंटाळून रमजानबी यांनी राहत्या घरात रुमालाने गळफास घेवून आत्महत्या केली. रमजानबी आपल्या घरात दोन मुले व एक मुलगी यांंच्यासोबत झोपलेली होती तर पती विनोद मुलतानी हा बाहेर झोपलेला होता. बुधवारी सकाळी उठल्यानंतर रमजानबी हिच्या मुलीच्या सदरचा प्रकार दिसून आला. याप्रकरणी विवाहितेेची आई आशाबी जुमा मुलतानी (वंजारी) (रा. कोथळी) यांच्या फिर्यादीवरुन तालेखा व शेखलाल मुलतानी यांच्याविरुध्द रमजानबी हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय सिचन इंगळे करीत
आहे.