विवाहितेला पाच लाखांसाठी छळले : मध्यप्रदेशातील पाच आरोपींविरोधात गुन्हा

जळगाव : चिंचोली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाख रुपयांसाठी छळ करण्यात आला. या प्रकरणी मध्यप्रदेशातील पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल
चिंचोली येथील काजल सुनील गोसावी यांचा मध्यप्रदेशातील भोपाळ येथील सुनील अशोक गोसावी यांच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवस चांगले पार पडल्यानंतर पतीसह सासरच्यांनी काजल हिच्याकडे तिने माहेरुन पाच लाख रुपये आणावेत व संसारोपयोगी साहित्य आणावे, अशी मागणी केली. याच कारणावरुन पतीसह सासरच्यांनी काजल हिचा दोन वर्षापर्यंत वेळावेळी मानसिक तसेच शारीरीक छळ केला. छळ असह्य झाल्याने काजल ह्या माहेरी निघून आल्या व याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पती सुनील अशोक गोसावी, अशोक प्रल्हाद गोसावी, हिराबाई अशोक गोसावी, विद्या सचिन गोसावी, वर्षा पुरूषोत्तम पाटील (सर्व रा.गोविंदपुरा, हुजरआण्णानगर, भोपाळ, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गफूर तडवी करीत आहेत.