विवाहितेला मारहाण करीत दुचाकीसह मोबाईल हिसकावला : जळगावातील प्रकार
एकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील अजिंठा हौसिंग सोसायटीत येथे काहीही कारण नसंताना एका महिलेला मारहाण करून तिच्या जवळील दुचाकी व मोबाईल जबरी हिसकावून मारहाण केल्याची घटना 27 ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा दाखल
दीपीका सत्यजीत सोनवणे (25, रा.अजिंठा हाऊसिंग सोसायटी, जळगाव) या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्याकडे (एम.एच.19 डी.यू.4282) क्रमांकाची ज्युपीटर दुचाकी आहे. 27, ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता त्या त्यांच्या घरी असतांना संशयीत आरोपी सत्यजीत रवींद्र सोनवणे (वाघ नगर) याने विवाहितेला काहीही कारण नसतांना मारहाण करून तिच्या ताब्यातील 50 हजार रूपये किंमतीची दुचाकी व तीन हजाराचा मोबाईल जबरी हिसकावून मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर 15 दिवसांनी महिलेने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी सत्यजीत रवींद्र सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार विजय पाटील करीत आहे.