शिरपूर। शिरपूर तालुक्यातील झेंडेअंजन येथील एका 19 वर्षीय विवाहितेला शिरपूर शहरालगत असलेल्या हॉटेल जवळून रिक्षात डांबून पळवून नेवून तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान याबाबत पिडीत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात दोघांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमारे 10/12 दिवसांपूर्वी शहरालगत असलेल्या आकाश गार्डन जवळील रस्त्यावरून झेंडेअंजन येथील एका 19 वर्षीय विवाहितेला शंट्या चिमा पावरा (रा.नाथ आंबा ता.शिरपूर) व पिरा पावरा (रा. केनारीपाडा ता.शिरपूर) या दोघांनी तिला बळजबरीत रिक्षात कोंबून पळवून नेले. त्यानंतर नाथ आंबा येथील संशयित आरोपीच्या घरात तिला डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. 4 दिवसांपूर्वी विवाहितेचा पती व तिच्या भावाला ही बाब समजल्यानंतर त्यांनी नाथ आंबा येथे जावून तिची सुटका केली. दोघेही संशयित फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. याबाबत पिडीत विवाहितेच्या आईन शिरपूर पोलिस ठाण्यात वरील दोघांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.