विवाहीतेला हुड्यांसाठी सासरच्यांकडून मारहाण

0

जळगाव । येथील सुप्रीम कॉलनी परिसरातील नितीन साहित्य नगरात राहणारी 22 वर्षीय विवाहितेला माहेरुन सोने व पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून मारहणा करण्यात आली. 80 ग्रॅम सोने व दोन लाख रुपये घेऊन ये या कारणावरुन मारहाण करुन शिवीगाळ करीत विवाहीतेस दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

चार जणांविरुध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ परिसरातील आरएमएस कॉलनीत राहणारी शिरपुर कन्हाळा भागातील गौरी शंकर श्रीरामे हिला 26 जून ते 12 जुलै 2016 या दरम्यान वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करुन तुझ्या माहेरुन वडिलांकडून 80 ग्रॅम सोने व 2 लाख रुपये रोख घेवून ये असे सांगितले असता, तिने न आणल्याने तिला मारहाण करुन शिवीगाळ करीत शारीरिक व मानसिक छळ केला. यावेळी गोरी शशांक श्रीरामे या विवाहितेच्या फिर्यादीवरुन औद्योगिक वसाहत पोलिस स्थानकात कलम 498 प्रमाणे पती शशांक अरुण श्रीरामे, सासरे अरुण देवचंद श्रीरामे, सासु सुवर्णा अरुण श्रीरामे, दीर देवेंद्र अरुण श्रीरामे सर्व रा. शिरपूर कन्हाळा आरएमएस कॉलनी, भुसावळ यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास एएसआय राजाराम पाटील हे करीत आहेत.