पुणे । विवाहाची प्रकिया पारदर्शक व्हावी यासाठी विवाहासाठी दयावयाची नोटीस आता ऑनलाईन देता येणार असून त्यासाठी पब्लिक डेटा एन्ट्रीची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी पत्रकार परिषदेतमध्ये दिली.
सुमारे 30 हजार विवाह या पद्धतीने
याबाबत कवडे म्हणाले, प्रत्येक जिल्हयातील मुख्यालयातील एक दुय्यम निबंधक यांना त्या जिल्हयासाठी विवाह अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुंबई,मुंबई उपनगर व पुणे या जिल्हयासांठी स्वतंत्र विवाह अधिकारी आहेत. राज्यात दरवर्षी सुमारे 30 हजार या पद्धतीने संपन्न होत असतात. आता ऑनलाइनपद्धती असल्याने ही प्रकिया आणखी सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. त्यामुळेच आता विभागाने दस्त नोंदणी प्रमाणचे विशेष विवाह नोेदणी प्रणालीचे देखील संगणीकरण केले आहे. यासाठी राज्यातील सर्व विवाह अधिकार्यांची कार्यालयेही मध्यवर्ती सर्व्हरवर जोडण्यात आली आहेत.
नोंदणी मात्र कार्यालयातच
ऑनलाइन सुविधाचा कायदा राज्यातील 30 हजार विवाह इच्छुकांचा होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे़ या नवीन ऑनलाईन सुविधेचा वापर करता येणार असला तरी विवाह करण्यासाठी मात्र नोंदणी कार्यालयातच यावे लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
ऑनलाइन प्रणाली 1 नोव्हेंबरपासून
विशेष विवाह कायदा 1954 हा केंद्रीय कायदा आहे. या कायदयानुसार विवाह संपन्न करण्यासाठी विवाह इच्छुक वर व वधू यांनी आपल्या नियोजित विवाहाची नोटीस संबंधित जिल्हयाचे विवाह अधिकार्यांना दयावी लागते. तसेच वय व रहिवासी याबाबत कागदोपत्री पुरावे दयावे लागतात व नोटीस की भरावी लागते. आता ऑनलाईन सुविधेमध्ये ही सर्व कामे केली जाणार आहेत.ऑनलाईन प्रणाली एक नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. त्यात एक नोंदणी ही ऑनलाईन करण्यात आली आहे. विवाह इच्छुक वर व वधुकडे आधार क्रमांक आवश्यक आिाण आधार प्रणालीबरोबर ओळख पडताळणी करण्यासाठी सहमती दयावी लागणार आहे. यासाठी राज्यातील सर्व विवाह अधिकार्यांची कार्यालयेही मध्यवर्ती सर्व्हरवर जोडण्यात आली आहेत.