विविध कला व हस्तकला वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन

0

पुणे । आपल्या मूळ संस्कृतीची अभिव्यक्ती असणारी संपूर्ण भारतभरातील कला, शिल्पकला आणि कपड्यांचे विविध संग्रह, संपूर्ण भारतातील विविध कला आणि हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन दस्तकरी हाट समितीतर्फे भरविण्यात आले आहे. यामध्ये मधुबनी कला, लाकूड आणि वस्त्रे, गोंड कला, मण्यांपासून बनलेली ज्वेलरी, पश्चिम बंगालची कन्टा कढाई, ब्लॉक प्रिंट, कढाई आणि राजस्थानचे वीणकाम, मध्य प्रदेशातील चंदेरी आणि माहेश्वरी, बनारसी विव्ह्स, उत्तर प्रदेशातील चिकन एम्ब्रॅायडी, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मातीची भांडी, पश्चिम बंगालमधील लिनन साड्या, ओरिसाचे चांदीचे दागिने आणि अन्य ब-याच प्रकारच्या हस्तकला प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. दस्तकरी हाट एक उत्सवपूर्ण, रंगीत आणि विविध शिल्पकलांनी समृद्ध असे प्रदर्शन आहे.

येथे संपूर्ण भारतातील हस्तकला, वस्त्रउद्योग आणि शिल्पकलेत पारंगत असलेले कलाकार त्यांचे कौशल्य प्रदर्शित करतात. लोककल्याणाच्या रोजगाराच्या संधी, कलाकृतींचे प्रदर्शन, खास सजावट आणि लोककलेच्या विविध कार्यक्रमांचे प्रदर्शन देखील येथे आहे. कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राममध्ये रविवार (दि.12) पर्यंत स. 11 ते 8 या वेळात प्रदर्शन होईल.